भारत-विंडीज एकदिवसीय मालिकेवर कोरोनाचं संकट !

अहमदाबाद-  भारत आणि वेस्ट इंडिजविरूध्दच्या एक दिवसीय मालिकेवर कोरोनाच संकट ओढवल आहे. भारतीय संघातील शिखर धवन , ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि नवदीप सैनी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच प्रशासकीय साहाय्यकांनाही कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

भारत आणि विंडीज या संघांमध्ये प्रत्येकी तीन सामन्यांची एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकांच्या तयारीसाठी भारतीय संघ ३१ जानेवारीला अहमदाबाद येथे दाखल झाला. त्यानंतर खेळाडू तीन दिवस विलगीकरणात होते. ‘‘धवन, गायकवाड, श्रेयस आणि नवदीप सैनी यांचा कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला आहे. तसेच दोन ते चार प्रशासकीय साहाय्यकांनाही कोरोनाची बाधा झाली आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले.

Share