चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं; देशात निर्बंध लागणार ?

दिल्ली- चीन आणि दक्षीण कोरीयात कोरोनोने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे चीन आणि कोरीयात निर्बंध लावण्यात आले आहेत. याचा परिणाम आता जागतिक स्थरावर किती हे पाहाणे महत्वाचे आहे. याच पार्श्वभूमीवर डब्लूएचओने सर्व देशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

२०२० मध्ये वुहानमध्ये सुरुवातीच्या उद्रेकानंतर चीन सध्या स्थानिक पातळीवर पसरलेल्या कोविड-१९ प्रकरणांच्या सर्वात मोठ्या लाटेशी लढत आहे. तसेच, आज चीनमध्ये दोन करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे. जानेवारी २०२१ नंतर करोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत झालेली ही पहिली वाढ आहे.

चीन, दक्षिण कोरिया आणि आफ्रिकेतील काही देशांमध्ये करोनाने हाहाकार माजवला आहे. या देशांमध्ये अचानक रुग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे या देशांमधील रुग्णसंख्या वाढल्याचं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दरम्यान, इतर देशांच्या तुलनेत भारताने ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे आलेली करोनाची लाट योग्यरित्या हाताळल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे.

Share