केंद्रीय मंत्रिमंडळात कोरोनाचा शिरकाव

मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ होत असुन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत : भारती पवार यांनी ट्विटरवरून आपल्याला कोरोना झाला असल्याची माहिती दिली आहे. गेली दोन दिवस नाशिक-मुंबई दौरा झाल्यानंतर डॉ. भारती पवार यांना त्रास जाणवू लागा. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली. या चाचणीचा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

डॉ. भारती पवार यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी संपर्कात आलेल्या लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. खासदार हेमंत गोडसे आणि भारती पवार दोन दिवसांच्या नाशिक-मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यानंतर खासदार गोडसे यांचा अहवाल प्रथम पॉझिटिव्ह आला. त्यानंतर डॉ. भारती पवार यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

Share