#पुष्पाऑनओटीटी : चाहत्यांसाठी खुशखबर!

मुंबई– सिनेमागृहातील यशानंतर पुष्पा चित्रपट ओटीटी प्लॅटफाॅर्मवर येत आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा प्रदर्शित झालेला ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे .  कोरोनामुळे प्रेक्षकांनी चित्रपटगृहांकडे पाठ फिरवल्यामुळे निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.

‘पुष्पा द राइज’ या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आणि अनेक रेकॉर्ड केले आहेत. आता हा चित्रपट ७ जानेवारी रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.या चित्रपटाने जगभरात जवळपास ३०० कोटी रुपयांची कमाई करत नवा रेकॉर्ड केला आहे.

Share