नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी घटनापीठाने पुढे ढकलली आहे. राज्यातल्या सत्तासंघर्षावर आता सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी ही १४ फेब्रुवारीला होईल अशी माहिती CJI डी. वाय चंद्रचूड यांनी दिली आहे.
सरन्यायाधीश वाय. एस. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठासमोर आजची सुनावणी पार पडली. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद सुरु केला. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण सात सदस्यांच्या घटनापीठाकडे देण्याची मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली.
Justice MR Shah: As Mr Sibal said, 14th (Feb) is a very auspicious day so all of you should be at your homes not here. #SupremeCourtofIndia #ShivSena #UddhavThackeray #EknathShinde
— Live Law (@LiveLawIndia) January 10, 2023
युक्तीवादादरम्यान सिब्बल यांनी गेल्या सुनावणीवेळी आम्ही नबाम राबिया खटल्याचा दाखला दिला होता. तसेच हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर न्यावं, अशी विनंती केल्याची आठवणही सिब्बल यांनी करुन दिली. त्यानंतर न्यायाधीशांनी सॉलिसिटर जनरल आणि शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांचं मत घेऊन ही सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.