नितीन गडकरींच्या हस्ते जिल्ह्यातील ‘या’ प्रमुख रस्त्याचे लोकार्पण

औरंगाबाद : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गानंतर जिल्ह्यातील महत्वाचा दुसरा मार्ग म्हणजे धुळे-सोलापूर हायवे. औरंगाबादमार्गे जाणाऱ्या धुळे-सोलापूर हायवेचे दि.२४ एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. शहरातील जाबिंदा लॉन्स किंवा एसएफएस मैदानावर हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली आहे.

सोलापूर ते औरंगाबादमार्गे धुळे हा एन एच 211 अंतर्गत शहराबाहेरून जाणारा महामार्ग वाहुतकीसाठी खुला झाला आहे. त्याचा लोकार्पण सोहळा नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल. एनएच 211 सह चार पूर्ण झालेल्या रस्त्यांचे लोकार्पण आणि जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या कामांचे भूमीपूजनदेखील नितीन गडकरी करतील. अनेक दिवसानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी शहरात येणार असल्याने त्यांच्या या दोऱ्याची जय्यत तयारी सध्या औरंगाबादेत सुरु आहे.

नव्याने तयार झालेल्या धुळे सोलापूर हायवेमुळे शहरातून जाणाऱ्या बीड बायपासवरील जड वाहतूकीचा ताण पूर्णपणे कमी झाला आहे. 21 डिसेंबर रोजी हा महामार्ग पूर्ण झाला. औरंगाबादमधून जाणाऱ्या या महामार्गावरील 30 किमीच्या अंतरात 1 पूल आहे. तर 2 पूल नव्याने बांधले आहेत. 10 ठिकाणी सर्व्हिस रोड आहेत. 8 अंडरपास आहेत. 4 पादचारी मार्ग, जनावरांसाठी 1 मार्ग, 2 जंक्शन्स आहेत. यात कुठेही ओव्हर ब्रिज नाही.

Share