‘हनी ट्रॅप’मध्‍ये अडकलेल्‍या हवाई दलाच्‍या जवानाला दिल्‍ली पोलिसांकडून अटक

नवी दिल्ली : ‘हनी ट्रॅप’मध्‍ये अडकलेल्‍या भारतीय हवाई दलाच्‍या एका जवानाला दिल्‍ली पोलिसांच्‍या गुन्‍हे अन्‍वेषण विभागाने अटक केली आहे. देवेंद्र शर्मा असे त्‍याचे नाव असून, हवाई दलाची गोपनीय माहिती त्‍याने पाकिस्‍तानची गुप्‍तहेर संघटना ‘आयएसआय’ला दिल्‍याचा संशय पोलिसांनी व्‍यक्‍त केला आहे.

भारतीय हवाई दलाचा जवान देवेंद्र शर्मा हा ‘हनी ट्रॅप’मध्‍ये अडकला होता. शर्मा याच्‍याकडून हवाई दलातील गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्‍न झाला आहे. धक्‍कादायक बाब म्‍हणजे, त्‍याच्‍या पत्‍नीच्‍या बँक खात्‍यातून काही संशयित आर्थिक व्‍यवहार झाल्‍याची माहिती प्राथमिक चाैकशीत समाेर आली आहे, असे वृत्त ‘एएनआय’ वृत्तसंस्‍थेने दिले आहे. हवाई दलाची गोपनीय माहिती पाकिस्‍तानची गुप्‍तहेर संघटना ‘आयएसआय’ला पुरविल्‍याच्‍या संशयावरुन दिल्‍ली पोलिसांनी देवेंद्र शर्मा याला अटक केली आहे. त्‍याची चौकशी सुरू असल्‍याचे दिल्‍ली पोलिसांनी म्‍हटले आहे.

https://twitter.com/ANI/status/1524582030105018368?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1524582030105018368%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fpudhari.news%2Fnational%2F182557%2Fiaf-jawan-in-the-honey-trap-held-on-charges-of-espionage%2Far

सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून ‘हनी ट्रॅप’
देवेंद्र शर्मा याची सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून एका महिलेची ओळख झाली. यातूनच पुढे तो तिच्‍या जाळ्यात ओढला गेला. त्‍याने भारतीय हवाई दलातील वरिष्‍ठ अधिकार्‍यांच्‍या पोस्‍टिंग व अन्‍य गोपनीय माहिती संबंधित महिलेला दिली असल्‍याचा संशय आहे. शर्मा हा मूळचा उत्तर प्रदेशमधील कानपूर येथील आहे. त्‍याचे सिम कार्ड पोलिसांनी जप्‍त केले आहे. दिल्‍ली पोलिसांनी त्‍याला ६ मे रोजी अटक केली आहे. याची माहिती लष्‍कराच्‍या गुप्‍तचर विभागाला देण्‍यात आली आहे. शर्मा याच्‍यावरील आरोप सिद्ध झाल्‍यास त्‍याला तीन वर्षांपासून ते जन्‍मठेपपर्यंतची शिक्षा होऊ शकते.

Share