सरकारकडून मागण्या मान्य; संभाजीराजेंचं उपोषण मागे

मुंबई : मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसलेले खासदार संभाजी छत्रपती यांनी उपोषण मागे घेतले आहे. उपोषण स्थळी एका लहान मुलाच्या हातून रस घेऊन खासदार संभाजीराजेंनी हे उपोषण सोडलं. मराठा समाजाच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याने हे उपोषण सोडत असल्याचं खासदार संभाजीराजें यांनी सांगितलं.  उपोषण सोडताना राज्याचे नगरविसकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील आणि सांस्कृतिक मंत्रीअमित देशमुख यांनी संभाजीराजे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्याचं लेखी उत्तर दिलं आहे.

राज्य सरकारकडून या सर्व मागण्या मान्य 

१. मराठा समाजातील युवकांना अधिकाधिक नोकऱ्या पुरवण्यासाठी प्रयत्न करणार

२. सार्थींच व्हिजन डाॅक्यूमेंटबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ३० जून २०२२ पर्यंत त्याची पूर्तता करणार

३. सार्थी संस्थेमध्ये रिक्त असणारी पद १५ मार्च २०२२ पर्यंत भरणार

४. सार्थी संस्थेच्या आठ उपकेंद्रासाठी जमीन देण्याचा प्रस्ताव देखील १५ मार्च, २०२२ पर्यंत मंत्रिमंडळासमोर ठेवणार.

५. व्याज परतावा संदर्भात कागदपंत्रांची पूर्तता करुन व्याज परतावा देऊ. यामुळे कर्ज मिळण्यास अडचणी येणार नाहीत.

६. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला १०० कोटींपैकी ८० कोटी दिले असून आणखी २० कोटी आणि पुरवणी मागणीद्वारे अतिरिक्त १०० कोटी निधी देणार.

Share