राज्यपालांनी वक्तव्य मागे घ्या आणि महाराष्ट्राची जाहीर माफी मागा

मुंबई : राज्यपाल भगससिंग कोश्यारी नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. समर्थ रामदास स्वामी नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय? असं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं होते. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादला तोंड फुटले असुन, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या सडकून टिका केली आहे.

राज्यपाल कोश्यारी आपण महाराष्ट्राचे प्रथम नागरिक म्हणून सगळीकडे मान, सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवत असताना हा महाराष्ट्र ज्यांच्या नावामुळे संपूर्ण जगभरात ओळखला जातो. त्यांच्याबद्दल बोलताना किमान अभ्यास करुन बोलायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु फक्त आणि फक्त राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि महाबली शहाजीराजे भोसले आहेत हे लक्षात घ्यावे. त्यामुळे रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले आपले वक्तव्य मागे घ्या आणि महाराष्ट्राची जाहीर माफी मागा, जय जिजाऊ जय शिवराय. असे ट्विट चाकणकर यांनी केले आहे.

 

https://twitter.com/ChakankarSpeaks/status/1498199973275463687?s=20&t=wsVj25PozMTQZfJZNWnewA

 

 

पुण्यात राष्ट्रवादी काॅँग्रेसचे  जोरदार आंदोलन 

पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर राष्ट्रवादी काॅँग्रेसने आंदोलन केले आहे. या आंदोलकांना महापालिकेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मात्र आंदोलक जबरदस्तीने आत प्रवेश करत असल्याने सुरक्षा रक्षक व आंदोलकांमध्ये प्रवेशद्वारावर बाचाबाची झाली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद पुण्याच्या मावळमध्ये उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसने आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढता आपला निषेध व्यक्त केला. राज्यपालांनी त्वरित महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अन केलेलं वक्तव्य मागे घ्यावं.अशी मागणी यावेळी करण्यात आली.तसेच भाजपची भूमिका मांडण्यापेक्षा राज्यपालांनी त्यांचं काम निःपक्षपातीपणे करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Share