डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमला तीन आठवड्यांची रजा मंजूर

दिल्ली- डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सध्या रोहतकच्या सुनारिया तुरुंगात आपल्या दोन महिला शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा भोगतोय. दरम्यान, त्याला सोमवारी तीन आठवड्यांसाठी फरलो मंजूर करण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तुरुंगातील एका अधिकाऱ्याने राम रहीमची पुढील तीन आठवड्यांसाठी सुटका झाल्याची पुष्टी केली. या काळात डेरा प्रमुखाला त्याच्या गुरुग्राम येथील फार्महाऊसवर राहण्यास सांगण्यात आले आहे.

त्याला ७ ते २० फेब्रुवारीपर्यंत फरलो देण्यात आला आहे. त्याच्या कुटुंबातील सदस्यांशिवाय डेरा प्रमुखाला कोणालाही भेटण्याची परवानगी दिली जाणार नाही.यापूर्वी, त्याला त्याच्या आजारी आईला भेटण्यासाठी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अनेक वेळा आपत्कालीन पॅरोल देण्यात आले होते, परंतु यावेळी त्याला फरलो मंजूर करण्यात आला आहे.

Share