अवैध वाळूचे बळी सुरूच; चार बालकांचा खड्ड्यात बुडून मृत्यू

बीड:  गेवराई तालुक्यातील शहाजानपूर चकला येथे अवैध वाळू उपशामुळे नदीपात्रात झालेल्या खड्ड्यात बुडून चार मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी सहा वाजता घडली. यामुळे वाळू माफियांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाविरुद्ध विरोधात गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

गणेश बाबू इनकर (वय आठ), आकाश राम सोनवणे(वय १०), बबलू गुणाजी वक्ते (वय ११, तिघेही रा.शहाजनपूर चकला) व अमोल संजय कोळेकर ( रा. तांदळवाडी ता.बीड) अशी मयत मुलांची नावे आहेत . शहाजानपूर व तांदळवाडी ही गावे चिकटून आहेत. दोन्ही गावचे लोक नदीपात्रातून ये- जा करतात. ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता हे चौघेही नदीपात्रात आले. काठावर बूट, चपला सोडून ते अमोल कोळेकर यास तांदळवाडीला जाण्यासाठी नदीपात्र ओलांडत होते. दरम्यान, नदीपात्रात ठिकठिकाणी अवैध वाळू उपसा केल्याने खड्डे पडलेले आहेत. पाण्यातून वाट काढताना खड्ड्याचा अंदाज न आल्याने एकापाठोपाठ एक असे चौघेही बुडाले. घटनास्थळी सहायक निरीक्षक संदीप काळे व मादळमोही चौकी पाेलिसांनी धाव घेतली.

अन माफियांना पाठबळ-
दरम्यान, तालुक्यात अवैध वाळू उपसा व वाहतूक सर्रास सुरू आहे. माफियांना स्थानिक प्रशासनाचे पाठबळ असल्याशिवाय त्यांची एवढी मुजोरी अशक्य आहे. यापूर्वीही अवैध वाळू उपशामुळे बळी जाण्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्यावह आठवड्यात अशी घटना घडली आहे. त्यामुळे जरी वरोपचारी कारवाया होत असला तरी या माफीयांकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात असल्याव्हे उघड आहे

Share