मोठी बातमी! नितेश राणेंना कोल्हापूरला हलवलं,छातीत दुखत असल्याची तक्रार

सिधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील खुनी हल्लाप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांचा कोठडीमधील मुक्काम वाढला आहे. नितेश राणेंना कोर्टाने १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान त्यांच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयामध्ये आज होणारी सुनावणीही पुढे ढकलण्यात आली आहे. लता मंगेशकर यांचं निधन झाल्याने आज राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याने न्यायालयाचं कामकाज बंद राहणार आहे. त्यामुळे आज सुनावणी होणार नाही. दरम्यान नितेश राणे यांना कोल्हापुरला नेण्यात आलं आहे.

नितेश राणेंनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. यानंतर त्यांना कोल्हापूरला नेलं जात आहे. रुग्णवाहिकेतून नितेश राणे यांना घेऊन पोलीस कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत.नितेश राणे यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण त्याच दिवसापासून छातीत दुखू लागलं होतं. रुग्णालयात योग्य ह्रदयरोगतज्ज्ञ नसल्याने त्यांना कोल्हापूरला हलवण्याचा निर्णय घेतला होता.

Share