राष्ट्रवादीचे सर्व विभाग आणि सेल कार्यकारिणी बरखास्त

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त करण्यात आले आहेत. एकीकडे महाराष्ट्रात रोजच नवनव्या राजकीय घडामोडी घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे विभाग आणि सेल तडकाफडकी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल पटेल यांच्या सहीचं एक पत्र चांगलंच व्हायरल होत आहे. त्यात पक्षाचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त करण्यात आल्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनेच हा निर्णय घेतल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यानंतर प्रफुल पटेल यांनी ट्वीट करत हा निर्णय राष्ट्रीय पातळीवर असल्याचं स्पष्ट केलंय. त्याचा महाराष्ट्र किंवा इतर कुठल्याही राज्यातील पक्ष संघटनेशी संबंध नसल्याचंही पटेल यांनी सांगितलं.

Share