नानाभाऊ मंत्रीपद मिळत नसल्याचा राग काढू नका- चित्रा वाघ

मुंबई-  नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या वक्तव्याने नवीन वाद सुरु झाला आहे. काँग्रेस विरूध्द भाजप असा वाद उफळल्याने यात महाविकास आघाडीतील दोन पक्षांनी मात्र मत व्यक्त करण्यास टाळाटाळ केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत हे कायम भाजपवर टिका  करत असतात परंतू त्यांनी या प्रकरणी मत व्यक्त करण्यास टाळाटाळ केली आहे.

तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांमध्ये  विचारणा केली असता त्यांनी म्हंटल की, मी अजून पर्यंत व्हिडीओ बघितलेला नाही. तसेच मर्यादा सोडून कोणी बोलू नये असं मत त्यांनी व्यक्त केल आहे.परंतू पटोलेंच्या वक्तव्यावरून राज्यात भाजप आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नाना पटोलेंना मंत्रीपद मिळत नसल्याने राग अनावर होत आहे तो कुठेही काढू नका अशी टिका करत ट्विट केलं आहे.

तसेच चित्रा वाघ यांनी ट्विट मध्ये म्हंटल आहे की , मोदींना मारू शकतो शिव्या देऊ शकतो, म्हणणाऱ्या नानांनी तालिबानी संघटनेत प्रवेश केलाय की , काँग्रेस पक्षाने तालिबानी संघटनांशी युती केली आहे. मोदीजी केवळ भाजपचे नेते नाहीत तर देशाचे सन्माननीय पंतप्रधान आहेत हे विसरून चालणार नाही. नानाभाऊंना मंत्रीपद मिळत नसल्याचा राग असा कुठेही काढू नका. अशी खोचक टिका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.

Share