विराट कोहलीने नाकारली बीसीसीआयची ऑफर

मुंबईः भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने दोन दिवसापूर्वी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. विराटला कसोटी कर्णधारपद सोडण्यापूर्वी बीसीसीआयने फेअरवेल मॅच ऑफर केली होती. पण विराटने ही ऑफर नाकारली. पण विराटने ही ऑफर का नाकारली, याचे कारणही आता समोर आले आहे.

जेव्हा विराट कोहलीने बीसीसीआयला फोनवरून कसोटी कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाची माहिती दिली. तेव्हा बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने त्याला बंगळुरूमध्ये एका छोटेखानी समारंभात निरोप देण्यात येईल, त्यासाठी तू बंगळुरूमधील फेअरवेल मॅचमध्ये नेतृत्व करावे, असे आश्वासन दिले होते. याला प्रत्युत्तर देताना कोहली म्हणाला, ‘एका सामन्याने काही फरक पडत नाही. मी तसा व्यक्ती नाही. त्यामुळे कसोटी संघाचे नेतृत्व सोडतानाही कोहलीने आपला अहंकार सोडला नाही, अशी प्रतिक्रीया चाहत्यांमध्ये आहे.

विराट हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने सर्वाधिक ४० कसोटी जिंकल्या आहेत. संघाचा माजी विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेही कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्यानंतर कोहलीला संघाची कमान देण्यात आली होती. त्याने संघाला सातव्या क्रमांकावरून कसोटीत पहिल्या क्रमांकावर नेले. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ५ वर्षे कसोटीत सर्वोत्तम संघ होता.

 

https://www.instagram.com/p/CY0tWYaPheU/?utm_source=ig_web_copy_link

 

Share