पंजाब- पंजाब विधान सभेच्या निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यावर आला आहे. २० फेब्रुवारीला मतदान होणार असून प्रत्येक पक्ष या ठिकाणी आपला कस लावू पाहत आहेत . या निमित्ताने पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकू शकतात. उत्तर प्रदेश, बिहारमधील भैय्यांना पंजाबमध्ये घुसू देऊ नका असं चन्नी यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे यावेळी प्रियंका गांधी त्यांच्या बाजूला उभ्या होत्या. या वक्तव्यावर त्यांनीदेखील हसत टाळ्या वाजवल्या आहेत.
चन्नी यांच्या वक्तव्यावर भाजपाने टीका केली असून त्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांचा अपमान केला असल्याचं म्हटलं आहे. उत्तर प्रदेशात जिथे काँग्रेस निवडणूक लढवत आहे तेथील लोकांचा प्रियंका गांधींनी अपमान केल्याचं भाजपाने म्हटलं आहे.
It is very shameful. We strongly condemn comments aimed at any individual or any particular community. Priyanka Gandhi also belongs to UP so she is also a 'bhaiya': AAP chief Arvind Kejriwal on CM Charanjit S Channi's reported remark 'don't let UP, Bihar ke bhaiya enter Punjab' pic.twitter.com/gRHY9SvyHe
— ANI (@ANI) February 16, 2022
आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही चरणजीत सिंग चन्नी यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. “हे खूप लाजीरवाणं आहे. आम्ही कोणत्याही व्यक्ती आणि समाजाविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो. प्रियंका गांधीही उत्तर प्रदेशच्या आहेत त्यामुळे त्यादेखील भैय्या आहेत,” असं अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.