‘राऊत आणि ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही…’, भातखळकरांची टिका

मुंबईः शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेत भाजपवार जोरदार टिका काली आहे. संजय राऊतांनी या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, मोहीत कंबोज, नील सोमय्या अशा भाजपाच्या अनेक नेत्यांवर आरोप केले आहेत. त्यावर भाजप नेत्यांकडुन अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राऊतांवर टिका केली आहे.

धमक्या आल्यात तर तक्रार का नाही केली? भातखळकर
संजय राऊतांनी त्यांना आलेल्या धमक्यांविषयी तक्रार का नाही केली? असा सवाल भातखळकरांनी केला आहे. राज्यात आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग आहे. जर धमक्या दिल्या, तर खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार दिली पाहिजे आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली पाहिजे. पण हे काही करत नाहीयेत कारण त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही असे ते म्हणाले.

राऊत-उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही- भातखळकर
राऊत म्हणजे काय महाराष्ट्र आहे का? मुंबई महानगर पालिकेत सोडा, पण नगरपालिकेच्या निवडणुकीतही संजय राऊत कधी निवडून आले नाहीत. आमच्यासोबत युती केल्याशिवाय यांना कधी १०० जागा मिळाल्या नाहीत. संजय राऊतांना वाटतं की त्यांचं भांडुपचं घर आणि मातोश्री म्हणजे महाराष्ट्र आहे. गैरसमजात राहू नका. महाराष्ट्र म्हणजे तुम्ही नाहीत. राऊतांनी एक महानगर पालिकेची निवडणूक तरी लढवावी. आयुष्यभर तुम्ही राज्यसभेत गेला आहात. राऊत-उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही, असे अतुल भातखळकर म्हणाले.

गृहमंत्री तर अस्तित्वातही नाहीयेत-भातखळकर
माझी राऊतांना विनंती आहे की एकदा तरी म्हणा ना की माझी चौकशी करा, असे देखील आव्हान भातखळकरांनी दिलेआहे. राज्याचे पोलीस बहुतेक या मुख्यमंत्र्यांचे देखील ऐकत नाहीयेत. गृहमंत्री तर अस्तित्वातही नाहीयेत, असा टोला भातखळकरांनी लगावला आहे.

Share