हीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका , चित्रा वाघ यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

मुंबई- पुण्यातील शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका तरूणीने बलात्कार आणि गर्भपाताचे आरोप करत गुन्हा दाखल केला होता. ती तरूणी सध्या गायब आहे परंतू या प्रकरणी आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कुचिक यांच्या विरोधात आवाज उठवला आहे. वाघ यांनी याप्रकरणी फेसबूक लाईव्ह आणि ट्विट करत या तरुणीची पुजा चव्हाण होवू देवू नका असे  मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे.

चित्रा वाघ व्हिडीओत म्हणाल्या की,  मी चित्रा वाघ अतिशय व्यथित होऊन हा व्हिडीओ करत आहे . शिवसेनेचा नेता रघुनाथ कुचिक ज्याला राज्यमंत्र्याचा दर्जाही देण्यात आला आहे . या हरामखोराने एका मुलीवर बलात्कार केला असून त्यानंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात केला. याच्याबद्दल समोर येऊन तिने या सर्व गोष्टी सांगितल्या. एवढ्या पुराव्यानंतरही त्याला कसा जमीन मिळाला हे मात्र माहिती नाही आणि विशेष म्हणजे दोनदा जामीन मिळाला आहे . सध्या तो जामीनावर बाहेर आहे. तो त्या मुलीवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे . ही केस मागे घे म्हणून तिला मेसेजेस करत आहेत. हे मेसेज कुणाला दाखवायेच ते दाखव मला काही फरक पडत नाही अशापद्धतीची त्याची भूमिका आहे. त्याच्या मागे त्याचा कर्ता करविता, बोलविता धनी कोण आहे?, असा प्रश्न व्हिडीओमध्ये चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

यी तरुणीने काल फेसबूकवर पोस्ट करत आयुष्य संपवण्याचे भाष्य केले आहे. त्यामुळे या मुलीचे बरे वाईट झाल्यास कोण जबाबदार असणार असा सवाल देखील चित्रा वाघ यांनी विचारला आहे. तसेच हि तरूणी मेली तर कुचिक तर जबाबदार असणारच पण पुणे पोलिस आणि राज्य सरकारला देखील जबाबदार ठरवल जाईल.  तिने केलेल्या सर्व पोस्ट मी आता पुण्याच्या सीपींना पाठवल्या, जॉइण्ट सीपींना पाठवल्या, गृहमंत्र्यांना पाठवल्या. कित्तेक फोन मी तिघांना केले एकानेही फोन उचलला नाही. माझे मेसेजेस पाहिले त्याला रिप्लाय सुद्धा दिलेला नाही. मला कळकळीची विनंती करायची आहे की वाचवा तिला वाचवा. ती मेल्यानंतर तुम्ही मोर्चे कराल, आंदोलने कराल, काळ्या फिती लावून फिराल, मेणबत्त्या घेऊन फिराल त्याला काही अर्थ राहणार नाही. जिवंती मुलगीय तिला वाचवा. हात जोडून विनंती करतेय मी. कुठे गेले सगळे कमिशन? झोपलेत का सगळे?,” असा संतप्त सवालही त्यांनी विचारलाय.

चित्रा वाघ यांनी रघुनाथ कुचिक यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो पोस्ट करत, “हिची पूजा चव्हाण होऊ देऊ नका मुख्यमंत्री महोदय. आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या कुचिकवर तात्काळ ३०७ चा गुन्हा दाखल करा, अशी मागणीही त्यांनी या दरम्यान केली आहे.

 

 

 

Share