‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबईः  लेखक, दिग्दर्शक प्रविण तरडेच्या आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाची मराठी सिनेसृष्टीत खूप चर्चा आहे. या चित्रपटाचा टिझर १८ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. तेव्हा पासुन या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती.  आता दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी या चित्रपटा प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. तर लवकरच ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेता गश्मीर महाजनी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वतः प्रवीण तरडे साकारत आहे.  तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट येत्या २७ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रविण तरडे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

 

‘हंसाजी मोहिते, स्वराज्य हे डोईवर आलेल्या धगधगत्या सूर्यासारखं. ते कायम धगधगतच राहिलं पाहिजे, परकिय आक्रमणांच्या काळरात्री येतच राहतील. अशा काळरात्रींना मधोमध चिरायलाच आपण केशरी रंग बनून जन्माला यायचं.’ ‘स्वराज्यात दोन-दोन वर्ष पाऊस नाही पडला तरीही थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जात आहे आपली’ ‘परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट’ हे तीन डायलॉग या टीझरमध्ये आहेत. सिनेमातले संवाद हे प्रविण तरडेंचे वैशिष्ट्य आहे. मुळशी पॅटर्न हा सिनेमा अजूनही संवादांमुळेच लोकांच्या लक्षात आहे. तसाच हा हंबीरराव मोहिते सिनेमाही त्यातल्या संवादांमुळे लक्षात राहिल यात शंका नाही.

 

Share