पेट्रोल-डिझेलच्या किंमती करण्याचा देखावा करु नका – मुख्यमंत्री

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात केल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. आधी किंमती वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करायच्या. हा देखावा नको, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे. अबकारी कर आणखी कमी करायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीवर केंद्र सरकारने आज मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये अनेक दिवसांपासून सातत्याने होत असलेली वाढ रोखण्यासाठी सरकारने उत्पादन शुल्कात मोठी कपात केली आहे. केंद्राने पेट्रोलच्या दरात ९.५० रुपये आणि डिझेलच्या दरात ७ रुपयांची कपात केली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री काय म्हणाल्या 

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्याची घोषणा करताना अर्थमंत्री सीतारामन म्हणाले की, मी सर्व राज्य सरकारांना, विशेषत: त्या राज्यांना आवाहन करू इच्छितो, जिथे शेवटच्या फेरीत (नोव्हेंबर २०२१) कपात करण्यात आली नव्हती. तेथेही अशी कपात लागू करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, उत्पादन शुल्कातील कपातीमुळे सरकारचा सुमारे एक लाख कोटी रुपये/वर्षाचा महसूल प्रभावित होईल.

Share