आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी दररोज फळे खाणे फायदेशीर ठरते. त्यातीलच एक फळ म्हणजे अननस. अननस हे अतिशय चवदार फळ आहे. त्याच्या मधूर चवीमुळे ते बहुतांश लोकांच्या आवडीचे फळ आहे.अननस असे खाण्याऐवजी याचा ज्यूस काढून प्यायले जाते. फ्रूट सॅलाडमध्येही याचा उपयोग केला जातो. अननस फक्त चव नाही तर आरोग्यासाठी देखील खुप फायदेशीर आहे
- हाडे मजबूत
जर तुम्हाला तुमची हाडे दीर्घकाळ मजबूत करायची असतील तर तुम्ही तुमच्या आहारात अननसाचा समावेश करा ह्यात मॅगनीज हे व्हिटॅमिन्स असल्यामुळे आपली हाडे मजबूत करण्यास मदत करतात . तसेच ब्रोमेलेचे अँटिइन्फ्लेट्ररी तत्व अर्थराइटिस सारख्या समस्या दूर करण्याचे काम करते. - सर्दी आणि खोकला
जेव्हा म्युकस मध्ये कोणत्याही प्रकारची सूज येते तेव्हा नाक गोठण्यास सुरवात होते. अननसमध्ये अँटीइंफ्लेमेट्री गुणधर्म असतात. ज्यामुळे ह्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत होते आपल्याला जर अशी समस्या असल्यास अननसाचे नियमित सेवन केल्याने आपल्याला अराम मिळतो. - तोंडाचे आरोग्य
अननस आपल्या तोंडचे आरोग्य राखण्यास देखील मदत करते. ह्यात व्हिटॅमिन सी असल्यामुळे दातातील प्लाकची समस्या टाळण्यास मदत होते . तसेच हिरड्यांच्या समस्येवर देखील फायदेशीर आहे. अननसमध्ये ब्रोमेलिन असते. जे दात चमकावणे व पांढरेपणा राखण्यास मदत करते. - वजन कमी करणे
अननस हे फळ आपल्याला वजन कमी करण्यास देखील मदत करते. अननस खाल्याने आपले पोट बऱ्याच वेळेपर्यंत भरलेले राहील ज्यामुळे आपल्याला इतर काही खाण्याची इच्छा होणार नाही व या कारणामुळे आपल्याला आपले वजन कमी करण्यास मदत होईल. - रोगप्रतिकारक शक्ती
अननस हे फळ खाल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ह्यात व्हिटॅमिन्स सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे सर्दी व इतर अनेक रोग बरे करण्यास मदत होते. अननस हा व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत आहे - कॅन्सर
अननस ह्या फळात अँटिऑक्सिडेन्ट व ब्रोमोलिन व्हिटॅमिन्स असल्यामुळे जे आपल्या शरीरातील मुक्त कणांशी (फ्री रॅडिकल्स )लढायला मदत करतात व पेशींचे नुकसान न होण्यास मदत करतात व तसेच कर्करोगाच्या अनेक प्रकारच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. - पचनक्रिया
अननस हे फळ आपली पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते ह्यात व्हिटॅमिन सी आणि फायबर चे प्रमाण असल्यामुळे आपली पचनशक्ती मजबूत करण्यास मदत करतात .अननसाच्या नियमित सेवनानाने आपल्याला आपल्या शरीरात जाणवणारा आळशीपणा व अपचन या दोन्ही समस्यांवर मात करता येते. - त्वचेसाठी लाभदायी
अननसमध्ये अँटिऑक्सिडेन्ट आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते . अननस फळाचे फायदे मुळे अँटिऑक्सिडेन्ट चेहऱ्यावरील सुरकुत्यानपासून दूर ठेवते. आणि व्हिटॅमिन सी मुळे त्वचेवर ग्लो येतो आणि त्वचा निरोगी राहते.