नाना पटोलेंच्या वकिलाच्या घरावर ईडीचा छापा

नागपुर : नागपुरातील बहुचर्चित अ‍ॅड. सतीश उके यांच्या घरावर आज सकाळी केंद्रीय तपास संस्थेचा छापा टाकला आहे. अ‍ॅड. सतीश उके हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील असून त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. त्यामुळं ते अधिक चर्चेत आले होते. गेल्या काही वर्षांपासून उके यांनी भाजप नेत्यांविरोधातन्यायालयात याचिका दाखल केल्या. तसेच पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनही ते भाजप नेत्यांवरआरोप करीत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील, अशीही त्यांची ओळख आहे.

काय आहे प्रकरण ?

नागपुरातील सुप्रसिद्ध वकील सतीश उके यांच्या घरावर अंमलबजावणी संचलनालयाने धाड टाकली आहे. पार्वती नगर भागातील निवासस्थानी गुरुवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास ईडी अधिकाऱ्यांनी छापा टाकला. सध्या ॲड सतिश उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप उके घरी आहेत. नागपुरातील एका जमीन व्यवहाराच्या संदर्भात उकेंना क्राईम ब्रांचने नोटीस बजावली होती. या प्रकरणाशी संबंधित ही छापेमारी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उकेंच्या घराबाहेर सीआरपीएफ जवान आणि पोलिसांचा बंदोबस्त पहायला मिळत आहे.

Share