सर्वसामान्यांना फटका, आज पुन्हा महागलं पेट्रोल-डिझेल, वाचा किती वाढले दर

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा सर्वसामान्यांना झटका दिला आहे. आज गुरुवारी पेट्रोल-डिझेल  दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे प्रत्येकी ८० पैशांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल प्रति लीटर १०१.८१ रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेल ९३.०७ रुपये प्रति लिटर झाले आहे. मुंबईत पेट्रोल, डिझेलचा दर प्रति लिटर मागे ८४ पैशांनी वाढला आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर ११६.७२ रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलचा दर वाढून १००.९४ रुपये झाला आहे.

गेल्या दहा दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत ९ वेळा वाढ करण्यात आली आहे. तर र डिझेल ६ रुपये ४० पैशांपर्यंत महागलं आहे. सध्या दिल्लीत एक लिटर पेट्रोलसाठी १०१.८१ रुपये आणि डिझेलसाठी ९३.०७ रुपये खर्च करावे लागत आहेत. यापूर्वी २१ मार्च रोजी राजधानीमध्ये पेट्रोलचे दर ९५.४१ आणि डिझेलचे दर ८७.६७ रुपयांवर होते.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकरे तपासा

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकताय. SMS च्या माध्यमातून देखील तुम्हाला नेहमीचे दर कळू शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून ९२२४९९२२४९ या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे.

Share