एकनाथ शिंदे गटाला धक्का; गटनेतेपदी अजय चौधरींना मान्यता

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. शिवसेना विधीमंडळ गटनेते पदावर अजय चौधरी तर प्रतोद पदावर सुनिल प्रभू यांना विधीमंडळाने मान्यता दिली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी ही मान्यता दिली आहे.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ बोलताना म्हणाले की, नियमानुसार पक्षप्रमुखांकडून गटनेत्याची नियुक्ती होते, आणि गटनेता प्रतोदांची नियुक्ती करतो त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. ते पत्र आपण स्विकारलं आहे. मात्र मला एकनाथ शिंदे गटाकडून मिळालेले पत्र देखील तपासून पहावे लागणार आहे मीडियातून काही गोष्टी समोर येत आहेत. नितीन देशमुख यांनी असा दावा केला आहे की त्या पत्रावर माझी सहीच नाही. मी इंग्रजीत सही करतो, मग पत्रावर मराठीत सही कशी आली? असा सवाल त्यांनी केला आहे तसेच या पत्रावर काही अपक्ष आमदारांच्या देखील सह्या आहेत. त्या सह्या ग्राह्य धरता येणार नाहीत. दोन्ही पत्र तपासल्यानंतरच याबाबत निर्णय देता येईल असे झिरवाळ यांनी म्हटले आहे.

Share