गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा नाही

मुंबईः गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा झालेली नाहीये. गेल्या आठवडाभरापासून लता मंगेशकर या रूग्णालयामध्ये दाखल आहेत. लताजींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, लताजी अजूनही आयसीयूमध्ये आहेत,  डॉक्टरांनी सांगितले की, लताजी किती दिवसांत बऱ्या होतील हे सांगणे कठीण आहे. लोकांनी लताजी यांच्यासाठी प्रार्थना करावी, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. लता मंगेशकर यांचं वय आणि त्यांची प्रकृती पाहता त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

लता मंगेशकर यांचा अनेक पुरस्कारांनी सम्मान

गानकोकीळा लता मंगेशकर यांनी वयाची ९२ वर्ष पूर्ण केली आहेत. त्यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी झाला. लतादीदींना भारतरत्न या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय त्या दादासाहेब फाळके पुरस्कार आणि फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर यासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झाल्या आहेत. १९७४ मध्ये, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्यांना इतिहासातील सर्वाधिक रेकॉर्डिंग केलेल्या कलाकार म्हणून स्थान दिले. त्यांनी १९४८ ते १९७४ या काळात २५,००० हून अधिक गाणी गायली आहेत.

Share