विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधार पदही सोडले

मुंबईः भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या कर्णधारपदाचा काल राजीनामा दिला आहे. टी ट्वेन्टी आणि एकदिवसीय संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर आता कोहलीने कसोटी संघाचं कर्णधारपद देखील सोडण्याचा निर्णय घेतलाय. हे. विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही महत्वाची माहिती दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये विराट कोहलीने रवी शास्त्री आणि धोनी यांचे आभार व्यक्त केले आहेत. विराटच्या पत्रात धोनी आणि रवी शास्त्री यांच्या नावाचा उल्लेख आहे.

 

संघाला एका योग्य दिशेनं घेऊन जाण्यासाठी मी सलग सात वर्ष अखंड मेहनत घेतली. त्यासाठी अविरतपणे झटलो. मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. प्रत्येक गोष्टीला कुठे ना कुठे अंत असतो. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार या नात्याला पूर्णविराम लावायची वेळ आता आली आहे. या प्रवासात मी अनेक चढउतार पाहिले, अनुभवले. पण कधीच कुठे कशाची कमी भासणार नाही, यासाठी मनापासून पूर्ण प्रयत्न केले. कोणतीही गोष्ट १२० टक्के क्षमतेनं करायची, या विचाराचा मी आहे. त्याच विचारानं मी काम केलं. पण जर त्याच क्षमतेनं मी एखादी गोष्ट करु शकत नसेन, तर योग्य वेळी जबाबदारीतून स्वतःला मोकळं करणं भाग आहे. अर्थात असं करणं योग्य नाही, याचीही मला जाणीव आहे. पण या बाबतीत मी स्वतःची आणि माझ्या संघाची फसवणूक करु शकत नाही. मनापासून विचार केल्यानंतर मी या निर्णयावर पोहोचलो आहे.

मी बीसीसीआयचे आभारा मनातो, की त्यांनी मना संधी दिली. देशाच्या संघाचं नेतृत्त्व करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो. या संपूर्ण प्रवासात कधीच कोणत्याही परिस्थितीच हार न मानण्याची शिकवण देणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचेही मी आभार मानतो. रवीभाई आणि मला नेहमी प्रोत्साहित करणाऱ्या पडद्यामागील महत्त्वाच्या सर्वजणांचं योगदानही मोठं आहे. तुम्ही जगण्याला दृष्टी देण्याचं मोलाचं काम केलं आहे. आणि सर्वात शेवटी मी एमएस धोनीचे शतशः आभार मानतो. त्याच्यामुळे मी कर्णधार बनू शकलो. धोनीला माझ्यात नेतृत्त्व दिसल्यामुळे, त्यानं भारतीय संघाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी माझं सुचवलं. त्याचे मनापासून आभार. असे ट्विट त्याने केले आहे.

धोनीबद्दल विराट काय म्हणाला?

महेंद्रसिंग धोनी… टी ट्वेन्टी, एकदिवसीय आणि २०१३ ची आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकवून देणारा भारताचा कर्णधार… ज्याच्या नेतृत्वात भारताला कायम विजय दिसला.. त्याच धोनीने ३० डिसेंबर २०१४ साली अचानकपणे भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. त्यानंतर आता पुढचा भारताचा कर्णधार कोण? अशी सगळ्यांनाच चिंता लागली. पण अशावेळी विराट कोहली पुढे आला. तो आला….. त्याने पाहिलं आणि जिंकलं… असंच त्याच्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीचं वर्णन करावं लागेल. कारण विराटने ६८ सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं. ज्यामध्ये भारताने ४० वेळा प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली. १७ वेळा भारताला अपयश आलं तर ११ वेळा टेस्ट ड्रॉ करुन भारताने प्रतिस्पर्ध्यांना ताकद दाखवून दिली. पण हे सगळं शक्य झालं त्या एका व्यक्तीमुळे, ज्याचं वर्णन विराटने पत्राच्या सरतेशेवटी केलं आहे, तो व्यक्ती आहे, लिजेंड एम एस धोनी….!

Share