शहरात डबलडेकर इलेक्ट्रिक बस धावणार पर्यावरण मंत्र्यांची घोषणा

औरंगाबाद : नागरिकांच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त डबलडेकर इलेक्ट्रिक बससारख्या पर्यावरणपुरक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यावर महानगर पालिकेने भर देण्याची सूचना पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
स्मार्ट सिटी कार्यालयाच्या आयोजित महानगर पालिकेच्या विकास कामांच्या आढावा बैठकीत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बोलत होते. मुंबईच्या धर्तीवर शहरात पर्यावरणपुरक अशा डबलडेकर इलेक्ट्रिक बस दाखल झाल्यास प्रवास क्षमता दुपटीने वाढून खर्चात कपात होईल. याकरिता महानगर पालिकेने पर्यावरणपुरक अशा या बस करीता लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याबाबत भर द्यावा. जेणेकरुन विकासाच्या दृष्टीने शहराच्या चिरंतन वाढीसाठी ही संकल्पना नक्कीच उपयोगी ठरेल असे सांगून क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या.
तत्पूर्वी शहरातील वातावरणीय बदल या संदर्भातील डब्लुआरआयचे कार्यक्रम अधिकारी आशा ढवल यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर औरंगाबाद शहरात होत असलेले वातावरणातील बदल यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पर्याव्रण पुरक वाहतूक व्यवस्थेसंदर्भात विविध सूचना केल्या. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई, आमदार अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, मनपा प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय, मनपाचे अतिरिक्त आयुक्त बी.बी.नेमाने, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ.पारस मंडलेचा यांच्यासह आदि उपस्थिती होते.
Share