खासदार गजानन किर्तीकर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार  गजानन किर्तीकर यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे.  त्यामुळे किर्तीकर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच त्यांचे नेतेपदही काढून घेण्यात आले आहे. कीर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटात केवळ ५ खासदार उरले आहेत. यापूर्वी ठाकरे गटातील १२ खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.

दरम्यान यानंतर गजानन कीर्तिकर यांची पक्षविरोधी कारवाया केल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली. याबाबतची माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

ठाकरे गटाकडून यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या पत्रात काय?
शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

कोण आहेत गजानन किर्तीकर ?

गजानन किर्तीकर हे शिवसेनेचे दिग्गज नेते असून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.

१९९० ते २००९ या काळात ४ वेळा आमदार राहिले आहे

कीर्तिकर हे मुंबईतील मालाड विधानसभा मतदारसंघातून ते आमदार होते.

शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये ते गृहराज्यमंत्री होते

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी गुरुदास कामत यांचा अंदाजे १,८३,००० मतांच्या फरकाने पराभव केला.

ते सलग २ वेळा लोकसभा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

Share