गिरीश महाजनांवर मोक्का लावण्यासाठी सरकारचे षड्यंत्र फडणवीसांचा गंभीर आरोप

मुंबई- राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आजच्या सत्रात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकावर गंभीर आरोप केले आहेत.  भाजपचे आ.  गिरीश महाजनांवर मोक्का लावण्यासाठी सरकारी वकील , एसीपी यांच्यामार्फत सरकराने षड्यंत्र रचल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. तसेच सरकार पोलिसांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला आहे. फडणवीसांनी अध्यक्षांना सरकारच्या षडयंत्राचे पुरावे दिले आहेत.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की,  देशामध्ये लोकशाही असून महाराष्ट्र पुरोगामी राज्य असल्याचे आपण म्हणतो. महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृतीमध्ये आपण एकमेकांचे विरोधक आहोत पण शत्रू नाहीत. महाराष्ट्राची पोलीस व्यवस्था ही प्रगल्भ आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांचा मला अभिमान आहे. पण अलिकडच्या काळात पोलीस दलाचा गैरवापर सरकारकडून वाढला आहे. सरकारचं षड्यंत्र करत असेल तर लोकशाहीला अर्थ उरत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

काय आहे प्रकरण?

जळगावमधील निभोरा पोलीस ठाण्यात याबाबत प्रथम फिर्याद नोंदविण्यात आली होती. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त अॅड. विजय पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे. मात्र कोथरूड परिसरात ही घटना घडल्यामुळे फिर्याद तिकडे वर्ग करण्यात आली. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार ट्रस्टची कागदपत्रे घेण्यासाठी तक्रारदाराला पुण्यात बोलविण्यात आले होते. मात्र तिथे त्यांना प्रथम एका हॉटेलमध्ये आणि नंतर एका फ्लॅटमध्ये नेण्यात आले. त्यानंतर काही लोकांनी, “गिरीशभाऊंना ट्रस्टवर ताबा हवा, म्हणून तुम्ही आता राजीनामा द्या”, अशी धमकी दिल्याचं पोलीस तक्रारीमध्ये पाटील यांनी म्हटलेलं आहे.

 

Share