औरंगाबाद : राज्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना, काॅंग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत, मात्र त्यांच्या नेत्यांमध्ये कायम दुरावा पाहायला मिळतो. आताही काॅंग्रेसचे नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या एका वक्तव्यानं महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आला आहे.
औरंगाबाद जिल्हा कांग्रेसतर्फे आयोजित डिजिटल सदस्य नोंदणीकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यकर्तांना न्याय देण्यात विलंब होतोय याची कबुली देत पण याचा विसर पडलेला नाही, याची जाणीवही करून दिली.
दरम्यान जिल्ह्यात काँग्रेस संपूष्ठात आहे. तिला वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम कराव तसेच आगामी निवडणूकीत काँग्रेस पूर्ण ताकदीने लढणार असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. तसेच या दरम्यान दूध संघाच्या नवनिर्वाचित संचालकांचे देशमुख यांनी स्वागत केले.