खोटे गुन्हे दाखल केले तर सहन करणार नाही : संदीप देशपांडे

मुंबई : मशिदींवरील भोंग्यांविरोधात काल मनसेनं आंदोलन केलं. मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेयर करुन शिवतीर्थावरील घटनेबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. या व्हिडिओत देशपांडे म्हणाले, महिला पोलीस अधिकाऱ्यांना आमचा स्पर्श सुद्धा झाला नाही. असं असतानाही आम्ही महिला अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घातली किंवा आमच्या धक्क्याने त्या पडल्या. अशाप्रकारचे आरोप आमच्यावर का केले जात आहेत ? पोलीस निरीक्षक कासार यांनी मला खेचण्याचा प्रयत्न केला. माझ्या बाजूला तेव्हा सात-आठ पोलीस अधिकारी होते. त्यामुळे महिला पोलीस अधिकाऱ्यांनी मला आणि संतोष धुरीला पकडण्याचा प्रश्नच येत नाही. घडलेला घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद आहे. राज ठाकरे साहेबांच्या घराबाहेरील कॅमेरे खोटं बोलणार नाहीत.जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती आम्ही पूर्ण करायला तयार आहोत. पण खोटे गुन्हे दाखल करणार असला तर मी सहन करणार नाही. माझी पोलिसांना विनंती आहे. माझी बायको घरी असते आणि ६ वर्षांचा मुलगा असतो. पुरुष पोलीस म्हणून तुम्ही रात्री बारा वाजता घुसण्याचा प्रयत्न करता, ते कृपया करु नका.


व्हिडिओत काय म्हणाले संदीप देशपांडे?

आम्ही सरकारच्या विरोधात बोलतो. मुख्यमंत्र्यी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बोलतो. संजय राऊतांच्या विरोधात बोलतो. आम्ही जेलला घाबरत नाही. आम्ही पोलीस कस्टडीला घाबरत नाही. जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती आम्ही पूर्ण करायला तयार आहोत. ज्या ज्या वेळेला आंदोलनं केली त्या त्या वेळेला हजर झालोय. पण अशा पद्धतीने खोटे गुन्हे दाखल करणार असला तर मी सहन करणार नाही. माझी पोलिसांना विनंती आहे. माझी बायको घरी असते आणि ६ वर्षांचा मुलगा असतो. पुरुष पोलीस म्हणून तुम्ही रात्री बारा वाजता घुसण्याचा प्रयत्न करता, ते कृपया करु नका. पोलिसांत पोलिसांसारखे वागा. मी घरी नाहीये. मी कायदेशीर सल्ला घेतोय. कायदेशीर सल्ल्यानुसार मी वागेल आणि किती दिवस मला जेलमध्ये ठेवणार ? मी त्या गोष्टीला घाबरत नाही. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायला तयार आहे. खोटे गुन्हे मी सहन करणार नाही. माझा न्यायालयावर आणि कायद्यावर पूर्ण विश्वास आहे.

Share