औरंगाबादेतील प्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्याचा उत्तराखंडमध्ये अपघात, पत्नीचा मृत्यु तर पती जखमी

औरंगाबाद : औरंगाबादच्या बजाज हॉस्पिटलमधील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ.अलका एकबोटे आणि त्यांचे पती डॉ.व्यंकटेश एकबोटे यांच्या गाडीला उत्तराखंडमधील गंगोत्रीजवळ अपघात झाला. यात अलका एकबोटे यांचे निधन झाले. तर पती व्यंकटेश एकबोटे हे जखमी झाले आहेत.

डॉ.अलका एकबोटे या गेल्या १४ वर्षांपासून बजाज हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. बजाज रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ आणि क्लिनिकल व मोलिक्युलार जेनेटिक्स प्रमुख म्हणून त्या काम करत होत्या.  या विषयी अधिक माहिती अशी,  डॉ. एकबोटे यांच्या गाडीचा मध्यरात्री अपघात झाला. या गाडीत डॉ.अलका एकबोटे यांच्यासोबत त्यांचे पती डॉ. व्यंकटेश एकबोटे देखील होते. ते सुद्धा जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. याशिवाय एमजीएम हॉस्पिटलमधील प्रसूती तज्ज्ञ डॉ.अनुप्रिया महर्षी जखमी झाल्या आहेत. या गाडीत आणखी काही प्रवासी असून तेदेखील जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांमध्ये औरंगाबादच्या इतर डॉक्टरांचा समावेश आहे. जखमींवर डेहराडूनमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Share