लातुरात एसटी बसला भीषण अपघात; ३० प्रवासी जखमी

लातूर : लातूर जिल्ह्यातील बोरगावकाळे येथे बसला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात बस मधील ३० प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर असून, जखमींना मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूरहून पुण्याकडे एसटी महामंडळाची बस रवाना झाली होती. लातूर जिल्ह्यातल्या बोरगाव काळे पाटीनजीक निलंगा येथून पुण्याला जात असलेल्या एसटी बस अपघात झाला. बस रस्त्यावरून खाली उतरल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुरुडजवळ बस पोहोचली असता चालकाने बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या खाली उतरली. रस्त्याच्या बाजूला असलेल्या छोट्याशा पुलावरून बस खाली धडकली. अचानक झालेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. या अपघातात बसमधील १४ जण जखमी झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. जखमी प्रवाशांवर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Share