देशातील ‘या’ राज्यांमध्ये पुन्हा मास्क वापरणे बंधनकारक

नवी दिल्ली : कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. केरळमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केरळ सरकारने राज्यात सर्वत्र मास्क घालणे पुन्हा बंधनकारक केले आहे. याबाबत सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ज्या अंतर्गत सर्व लोकांना सर्व सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे.

सरकारच्या सूचनेनुसार, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगची ही मार्गदर्शक तत्त्वे पुढील ३० दिवस राज्यात लागू राहतील. सर्व दुकाने, चित्रपटगृहे आणि विविध ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था करण्याच्या सूचनाही सरकारने दिल्या आहेत. सोमवारी देशात कोरोनाचे ११४ नवीन रुग्ण आढळले आहेत. देशात कोरोनाचे २११९ सक्रिय रुग्ण आहेत. देशातील कोरोनामधून बरे होण्याचा दर ९८ टक्क्यांच्या पुढे गेला आहे.

Share