दिशा सलीयान प्रकरणी राणे पिता – पुत्रा विरोधात गुन्हा दाखल

मुंबई- केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशा सलियान हिच्या कुटुंबीयांनी राणे पिता पुत्राविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती, असा दावा गेल्या आठवड्यात नारायण राणेंनी केला होता. याप्रकरणी कुटुंबीयांनी राणेंकडून दिशाची बदनामी होत असल्याचा आरोप केला होता. दरम्यान आज त्यांनी राणे पिता-पुत्रांविरोधात तक्रार दाखल केली असून मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दिशा सालियनवर बलत्कार करून तिची हत्या झाली आहे. ती गरोदरही होती, असा दावा नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यावर सालियन कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत आक्षेप घेतला होता. राणेंमुळे आपल्या मुलीची बदनामी होत आहे, त्यांनी तिची बदनामी करणं थांबवावं, असं आवाहन सालियन कुटुंबीयांनी केलं होतं. त्यानंतर आता सालियन कुटुंबीयांनी पोलिसांत राणे पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मृत्यूपश्चात देखील होत असलेल्या आपल्या मुलीच्या बदनामीमुळे व्यथित झालेल्या दिशा सॅलियनच्या आई वडिलांनी या संदर्भात दिशाच्या मृत्यूबाबत खोटी व बदनामीकारक माहिती देणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, आ.नितेश राणे व संबंधित सर्व व्यक्तींवर कारवाई करावी. तसेच दिशाबद्दल समाजमाध्यमावर नमूद असलेली चुकीची व बदनामीकारक माहिती काढून टाकण्यात यावी अशी तक्रार आई वसंती सॅलियन व वडील सतीश सॅलियन यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे केली आहे.

Share