अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अखेर औरंगाबादच्या सीटी चौक पोलीस स्थानकात राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच सभेच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद सभेत पोलिसांनी त्यांना १६ अटी शर्थीचं पालन करण्याचं बजावलं होतं. त्यातल्या १२ अटींचं उल्लंघन केल्याने राज ठाकरेंवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात ११६, ११७ तसेच महाराष्ट्र पोलीस अॅक्ट १३५ नुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय १५३ अ कलमानुसार त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. यातही राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र गुन्ह्याची नोंद आहे. दोन समुहांमध्ये भांडण लावल्याचा आरोप ठाकरेंवर करण्यात आलाय. तसेच प्रक्षोभक वक्तव्य करणे, अटींचं उल्लंघन करणे यानुसार ठाकरे यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.

मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा
दुसरीकडे उद्याचं आंदोलन लक्षात घेता गृहविभाग अॅक्शन मोडमध्ये आला असून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या जात आहेत. मनसे नेते बाळा नांदगावर, संदीप देशपांडे नितीन सरदेसाई यांच्यासह राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. औरंगाबादमध्ये मनसेच्या ३ शहराध्यक्षांसह ४० जणांना कलम १४९ अन्वये गुन्हा प्रतिबंधक नोटीस पाठवण्यात आली आहे.

Share