पाच राज्यांचा कौल आज ठरणार !

दिल्ली- देशाच्या राजकारणात सर्वात महत्वाचं राज्य मानलं जाणार उत्तरप्रदेश त्यानंतर पंजाब , गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या राज्यात निवडणूका पार पडल्या आहेत . या निवडणूकींची मतमोजणी आज होत असून कोणता पक्ष अव्वल ठरणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

उत्तरप्रदेशात मतदान झालं त्यानंतर भाजप सत्ता कायम राखणार असल्याचा कौल समोर आला आहे. मात्र, आपल्याला बहुमत मिळेल, असा विश्वास प्रतिस्पर्धी सपा आघाडीला आह़े.  पंजाबमध्ये सत्तांतर, तर उत्तराखंड आणि गोवा आणि मणिपूरमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यात रस्सीखेच होण्याचा अंदाज चाचण्यांनी वर्तवला आह़े.  निकालोत्तर राजकीय जुळवाजुळव करण्यासाठी काँग्रेस आणि भाजपचे बडे नेते या राज्यांत तळ ठोकून आहेत़ . त्यामुळे आता प्रत्यक्षात कौल कोणाला मिळतो, याकडे सर्वाचे लक्ष लागले आह़े.

Share