अंगावर वीज कोसळून खेळाडूचा जागीच मृत्यू; Indonesia

फुटबॉलच्या एका लाईव्ह सामन्यात अंगावर वीज कोसळून  खेळाडूचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. इंडोनेशियातल्या (Indonesia) बान्डुंगमध्ये फुटबॉलचा हा सामना सुरु होता. इथलं वातावरण पावसाळी होतं. दोन संघ एकमेकांना भिडले होते, आणि चुरशीचा सामना रंगला होता. इतक्यात डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच एका खेळा़डूवर वीज कोसळते. ही घटना कॅमेरात कैद झाली आहे. 10 फेब्रुवारीची ही घटना आहे. बान्डुंग मधल्या सिलिवांगी स्टेडिअममध्ये (Siliwangi Stadium) दोन लोकल क्लब्सदरम्यान फुटबॉलचा सामना  रंगला होता. सामना सुरु होऊन पंधरा मिनिटं होऊन गेली होती. सामना रंगतदार होत होता. त्याचवेळी वातावरणात बदल झाला. आकाशात ढग दाटून आले आणि त्याचवेळी पहिल्यांदा वीज कोसळली. पण यात कोणतीही हानी झाली नाही. पण पुढच्याच क्षणाला दुसऱ्यांदा वीज कोसळली. पण यावेळी थेट मैदानात एका खेळाडूच्या अंगावर ती वीज पडली.

इंडोनेशियातील मलंग येथील कांजुरहान स्टेडियम पाडून पुन्हा बांधलं जाईल, अशी माहिती इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो (Joko Widodo) यांनी आज दिली. याच स्टेडियमवर महिन्याच्या सुरुवातीला सामन्यादरम्यान घडलेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 133 निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला.  या घटनेचं वर्णन फुटबॉल इतिहासातील सर्वात मोठी आपत्ती म्हणूनही करण्यात आलंय.

जोको विडोडो यांनी फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांना सांगितले की, “मलंग येथील कांजुरहान स्टेडियम पाडून पुन्हा बांधलं जाणार असल्याची माहिती दिली. ज्यात खेळाडू आणि समर्थक दोघांची सुरक्षा सुनिश्चित असेल.”

 

Share