“शेतकरी प्रश्नावर मोदी सरकारचे मौन आहे”; राहुल गांधी

खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला उत्तर महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. भारत जोडो यात्रा आज दुपारी नाशिकमध्ये पोहोचणार आहे. यावेळी होणाऱ्या रोड शोची काँग्रेसकडून करण्यात आली आहे. तेव्हा राहुल गांधी म्हणाले,

  •  “७२ कोटी लोकांकडं जेवढे पैसे आहेत, तेवढे पैसे देशातील २२ लोकांकडे आहेत. कोणत्याही राज्यात शेतकऱ्यांसाठी एमएसपी लागू करण्यात आली नाही. आमचे सरकार आल्यानंतर किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजना लागू करण्यात येईल. पीक विमा योजनेत काही कंपन्यांना पैसा दिला जातो. मात्र, शेतकऱ्यांना नुकसान होऊनही कंपन्यांकडून पैसे मिळत नाही. त्यासाठी सरकार आल्यानंतर पीक विमा योजना परत करण्यात येणार आहे. शेतमाल निर्यात करताना सरकारकडून अचानक आयात-निर्यात धोरण अचानक बदलण्यात येते. आमचे सरकार आले तर शेतकऱ्यांचे हित करणारे आयात-निर्यात धोरण लागू केले जाईल. शेतकऱ्यांवर जीएसटी लागू आहे. त्याबाबत निर्णय घेतला जाईल. सरकारचे दरवाजे शेतकऱ्यांसाठी सदैव खुले राहणार आहेत.”
  • केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी लागू केल्यानं कांद्याचे दर घसरल्याचा आरोप माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केला.
  • राहुल गांधी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, ” शेतकरी प्रश्नावर मोदी सरकारचे मौन आहे. महागाई, बेरोजगारी आणि मुद्द्यावर मोदी सरकारचं मौन आहे. कांद्याच्या दराबाबत कोणतीही चर्चा केली नाही. पंतप्रधान मोदी कधी समुद्रात तर कधी विमानात जातात. त्यांच्या पाठीमागे माध्यमं जातात.
  • नरेंद्र मोदी सरकारनं तुमचे कर्ज किती माफ केले. एक रुपया कर्ज माफ केले नाही. उद्योपतींचे सरकारनं १६ लाख कोटी कर्ज माफ केले. हा आकडा सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांना समजत नाही. मात्र, उद्योगपतींना हा आकडा समजतो. मनरेगासाठी ६५ हजार कोटी रुपये लागतात. १६ कोटी लाख रुपये म्हणजे २४ वर्षांची मनरेगा योजना आहे.

नंतर त्यांनी रत्ना भिल या महिलेच्या घरी जाऊन संवाद साधला. यावेळी रत्ना यांच्या मुलानं जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अडचणी येत असल्याचं काँग्रसेच खासदार यांनी सांगितलं. या भेटीचा व्हिडिओ खासदार राहुल गांधी यांनी एक्स मीडियावर पोस्ट केला. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, देशातील प्रत्येक गरीब महिलेनं ‘महालक्ष्मी योजना’ काळजीपूर्वक समजून घेणे आवश्यक आहे. काँग्रेसनं प्रत्येक गरीब कुटुंबातील महिलेला महालक्ष्मी मानून तिच्या खात्यात दरवर्षी लाख रुपये जमा करण्याचा संकल्प केला. ही केवळ योजना नसून अर्ध्या लोकसंख्येच्या उत्तम आरोग्याची, सुरक्षिततेची, सन्मानाची आणि समृद्धीची हमी असल्याचंही खासदार गांधींनी पोस्टमध्ये म्हटलं.

Share