डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं ‘पाणी पाजण्याची’ वेळ आलीय

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली होती, असा दावा भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांवर आता #SudhanshuTrivedi हा भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला. आपल्या दैवतांवर एकेकाने चिखलफेक करून दुसऱ्या कुणाचं प्रतिमासंवर्धन करण्याचा तर हा डाव नाही ना? असा सवाल त्यांनी ट्विटमधून उपस्थित केला. पुढे रोहित पवार म्हणाले, की आता डोक्यावरून पाणी चाललंय.त्यामुळं डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं ‘पाणी पाजण्याची’ वेळ आली आहे, असा इशारा त्यांनी दिला.

काय म्हणाले होते सुधांशू त्रिवेदी
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीनाम्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र आधीच्या काळात अनेक लोक सुटकेसाठी आणि अडचणीतून बाहेर पडण्यासाठी माफी मागत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबला पाच वेळा पत्र लिहिलं होतं. मग त्याचा अर्थ काय होतो? ब्रिटीश संविधानाची शपथ तर नाही घेतली ना? असं सुधांशू त्रिवेदी म्हणाले होते.

Share