आजोबांचा ठाकरी बाणा माझ्यातही आला; ठाकरेंची खास पोस्ट

मुंबई : संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक असणारे पत्रकार, समाजसुधारक, वक्ते केशव ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची आज पुण्यतिथी… यानिमित्ताने त्यांचे नातू आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटवरुन एक फोटो ट्विट करुन त्यांच्या स्मृती विनम्र अभिवादन केले आहे.

 

राज ठाकरे आपल्या ट्विट म्हणतात, आज आमच्या आजोबांची – प्रबोधनकारांची पुण्यतिथी. अन्याय दिसला तर लाथ मारायची, जे खरं असेल ते ठासून मांडायचं, आणि हे करताना नफा, नुकसान असल्या क्षुल्लक गोष्टींचा विचार करायचा नाही, हा आजोबांनी दिलेला ‘ठाकरी’ बाणा, जो पुढच्या पिढीत आला आणि माझ्यातपण आला. मी आजोबांनी रुजवलेला हा ठाकरी बाणा कायम कटाक्षाने अंमलात आणायचा प्रयत्न करत आलोय आणि पुढे पण करत राहीन. आणि हेच बाळकडू पुढे पण देईन हे नक्की, असा विश्वास व्यक्त करतानाच राज यांनी आजोबांच्या स्मृतीस अभिवादन केलं.

दरम्यान, दुसरीकडे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर आज एकाच व्यासपीठावर येणार आहेत. निमित्त आहे ते ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या लोकार्पणाचे… प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

Share