माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं निधन

अहमदनगर :  माजी मंत्री शंकरराव कोल्हे  यांचे वृद्धपकाळाने आज पहाटे निधन झाले आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  त्यांच्यावर आज दुपारी ४ वाजता कोपरगावमध्ये संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

माजी मंत्री शंकरारराव कोल्हे यांनी १९६० मध्ये सहकाराच्या माध्यमातून संजीवनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. सहकाराच्या माध्यमातून त्यांनी रासायनिक प्रकल्प यशस्वी करत राज्याला अनेक पायलट प्रकल्प दिले. १९७२ मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून विधानसभेची उमेदवारी केली आणि कोपरगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व खऱ्या अर्थाने येथून सुरू झाले. १९८५ ते १९९० चा अपवाद सोडता ते सहा दशके आमदार होते.  येसगावचे सरपंच ते मंत्री आणि इतरही अनेक महत्वाच्या संस्थांचे पदाधिकारी म्हणून त्यांनी मजल मारली. त्यांना विविध पुरस्कार मिळाले. विविध विषयांवरील त्यांची पुस्तकेही आहेत. विविध क्षेत्रातील अभ्यासासाठी त्यांनी परदेश दौरे दखील केले होते.

Share