महाविकासआघाडी सरकार झुकती है, बस झुकानेवाला चाहिए

मुंबई :  गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात वीज कनेक्शन तोडण्यात येत आहे. वीज तोडणीमुळे शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे. अशात काल महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनातच शेतकऱ्यांच्या वीज तोडणीसंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला आहे. शेकतऱ्यांच्या वीज तोडणीची कारावाई तात्पुरत्या स्वरुपात थांबवत असल्याची घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली.

दरम्यान या निर्णयाचे विरोधकांनी स्वागत केलं. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयावरुन महाविकास आघाडी सरकारला टोला देखील लगावला आहे. महाविकासआघाडी सरकार झुकती है, बस झुकानेवाला चाहिए!. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून भाजपाने लावून धरलेल्या शेतकऱ्यांच्या वीजतोडणी संदर्भात अखेर मविआ सरकारला नमावेच लागले. वीजतोडणी तत्काळ थांबवण्याचे ऊर्जामंत्र्यांचे आदेश. गोरगरीब शेतकऱ्यांसोबत भाजपा सदैव खंभीरपणे उभी आहे.” असं चंद्रकांत पाटील यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

याचबरोबर, हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल दिला आहे. हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे. यासोबतच कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबच्या बंदीला आव्हान देणाऱ्या विविध याचिका फेटाळून लावल्या आहेत. यावर देखील भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Share