राष्ट्रवादीच्या माजी खासदाराचा ‘तृणमूल कॉंग्रेस’मध्ये प्रवेश

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काॅँग्रेसचे माजी खासदार मजिद मेमन यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तृणमूल काँग्रेसचे खा. डेरेक ओब्रायन आणि खा. सौगता रॉय यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

कोण आहे माजिद मेमन?
माजिद मेमन हे राजकारणी तसेच वकील आहेत. आमदार म्हणून त्यांनी कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, कायदा आणि न्याय यावरील संसदीय समितीचे सदस्य म्हणून काम केलं आहे. तसेच त्यांनी कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून देखील काम केले आहे. २०१४ मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना राज्यसभेवर पाठवले होते. ते २०२० मध्ये राज्यसभेतून निवृत्त झाले.

Share