वऱ्हाडी आयशरचा अपघात चार जण ठार,३० जखमी

वैजापूर : वऱ्हाडाच्या गाडीला अपघात होऊन चार जण जागीच ठार झाले आहेत, तर २५ ते ३० जण जखमी झाल्याची धक्कादायक  घटना वैजापूर तालुक्यातील शिवराई गावाजवळ सोमवारी (ता.३१) पहाटेच्या सुमारास घडली. कविता बाबासाहेब वडमारे (वय ४५), प्रज्ञा गौतम गायकवाड (१७), दीपक वर्‍हाळे (८), ललिता पवार (४८, सर्व रा.अंबड जि.नाशिक) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत . जखमींना वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, आयशर मधून लग्नाचं वऱ्हाड औरंगाबादहुन नाशिककडे निघाले होते.आयशरमध्ये एकूण ३५ लोकं होती. वऱ्हाडाची गाडी शिवराई गावाजवळ येताच समोरून येणाऱ्या ट्रकचा आणि आयशरचा अपघात झाला. ज्यात वऱ्हाडमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जणाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. तसेच यातील २५ ते ३० जण जखमी असून, त्यांच्यावर वैजापूर आणि औरंगाबाद शासकीय घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे.अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस अधीक्षक व वैजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

Share