Australian Open 2022: राफेल नदालचे विक्रमी २१वे ग्रँड स्लॅम

रविवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात नदालने रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा पाच सेटमध्ये पराभव करत विक्रमी २१व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर आपले नाव कोरले आहे. २ वर्षे टेनिय केर्ट पासून लांब राहिलेल्याने आपण निवृत्ती घ्यावी का ? असं त्याच्या मनात सुरु होतं परंतू त्याने केलेली मेहनत आज दिसून आली. त्याच्या या पुनरागमनाचं आश्चर्य आणि कौतुक केलं जात आहे.

 

नदालने तब्बल पाच तास आणि २५ मिनिटे रंगलेल्या अंतिम सामन्यात दोन सेटच्या पिछाडीनंतरही २-६, ६-७ (५), ६-४, ६-४, ७-५ अशी बाजी मारली. त्यामुळे त्याने पुरुष टेनिसपटूंमधील सर्वाधिक २१ ग्रँडस्लॅम जेतेपदांचा विक्रम आपल्या नावे करताना रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोव्हिच यांना मागे टाकले आहे.  तसेच ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा जिंकण्याची ही २००९ नंतर दुसरी वेळ आहे.

 

Share