तेल कंपन्यांकडून इंधनाचे दर जारी, आज पेट्रोल-डिझेलची किंमत वाढली की कमी झाली?

नवी दिल्ली : पेट्रोलियम कंपन्यांनी आज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. केंद्राकडून एक्साइज ड्युटी आणि राज्यांनी वॅट हटवल्यानंतर इंधन दर कमी झाला आहे. कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेल दरात कोणताही बदल केलेला नाही.

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीच्या दबावातही कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीत बदल केलेला नाही. आज सकाळी जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल ११२.२डॉलर होती, तर WTI प्रति बॅरल ११७.८ डॉलरवर पोहोचली आहे. इतकेच नाही तर सौदी अरेबियासारख्या प्रमुख तेल उत्पादक देशांनी भारतासह आशियातील त्यांच्या खरेदीदारांसाठी क्रूडच्या किमतीत २ डॉलरने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रिफायनरी कंपन्या खूप मार्जिन कमावत आहेत, त्यामुळे अधिक कमाई करण्यासाठी आम्हाला क्रूडच्या किमती देखील वाढवाव्या लागतील, असं त्यांनी म्हटलं.

देशातील महानगरांतील किमती काय?

आज मुंबईत पेट्रोलचा दर १११.३५ रुपये तर डिझेलचा दर ९७.२८ रुपये प्रतिलिटर आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लीटर तर डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर मिळत आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत १०६.०३ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे. तसेच चेन्नईमध्येही पेट्रोल १०२.६३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकरे तपासा

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकताय. SMS च्या माध्यमातून देखील तुम्हाला नेहमीचे दर कळू शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून ९२२४९९२२४९ या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे.

Share