लातूर जिल्ह्याच्या रस्ते विकासासाठी कोट्यवधींचा निधी – खासदार सुधाकर शृंगारे

लातूर : जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यांमधील रस्ते विकासासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्या संदर्भात काल दिल्ली येथे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने विशेष बैठख बोलविली होती. या बैठकीत लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी जिल्ह्यातील निधी अभावी रखडलेल्या रस्त्यांच्या कामांकडे केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री साध्वी निरंजना ज्योती यांचे लक्ष वेधले. या बैठकीत जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते विकासासाठी जवळपास १०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दिल्ली येथे झालेल्या या बैठकीला राज्यातील इतरही खासदार आणि संबंधित विभागाचे राज्यातील अधिकारी उपस्थित होते.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून पूर्ण करण्यात येत असलेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामाला अधिक गती देण्यासाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने राज्यातील खासदार आणि अधिकाऱ्यांची बुधवारी (ता. २१) दिल्ली येथे बैठक बोलाविली होती. या बैठकीत खासदार सुधाकर शृंगारे यांनी लातूर जिल्ह्यातल्या रस्ते आणि पुलांच्या कामासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा याकडे लक्ष वेधले. जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची कामे निधी अभावी संथ गतीने सुरु असल्याचेही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. लातूर जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यांमधील रस्ते विकासासाठी भरीव निधी मंजूर करण्यात येत असल्याचे केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजना ज्योती यांनी यावेळी सांगितले.

खासदार सुधाकर शृंगारे यांनी निधी उपलब्ध करून देण्यासंबंधी मागणी केलेली तालुकानिहाय प्रमुख कामे पुढील प्रमाणे आहेत . तालुका औसा , आलमला ते उंबडगा , गुळखेडा-टाका-मासुर्डी-एकंबीवाडी . तालुका अहमदपूर-उगीलेवाडी-कोळवाडी-सावरगाव(रो)-नागठाणा . थोरलेवाडी-तळेगाव-नांदुरा (बु). तालुका चाकूर , जानवळ रेल्वे स्टेशन-जानवळ -कवठाळी- जगळपूर (खु) . तालुका देवणी, राष्ट्रीय महामार्ग ते हंचनाळ-कर्नाटक सीमे पर्यंत . तालुका जळकोट, कुणकी -जळकोट -रावणकोळा-अतनूर . तालुका निलंगा , कासारशिरसी- कोराळेवाडी- कोराळी-राज्य हद्द पर्यंत. आनंदवाडी-वळसंगी-गिरकचाळ. तालुका लातूर, रामेश्वर-जवळा(बु),पिंपरी आंबा-भिसे वाघोली-जिल्हा हद्द पर्यंत. तालुका उदगीर , हेर- डिग्रस. सताळा ते वायगाव ते भाकसखेडा ( पुलाचे बांधकाम ). या प्रमुख ग्रामीण रस्त्या बरोबरच अनेक पुलांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार सुधाकर शृंगारे यांनी केली होती. कोट्यवधींचा हा निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल खासदार सुधाकर शृंगारे यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंह, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजना ज्योती यांच्यासह केंद्रीय ग्रामीण विकास विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Share