ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवामुळे राडा, विजयी मिरवणूकीवर केली दगडफेक

माधव पिटले / निलंगा : तालुक्यातील तांबाळा येथील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाल्यानंतर गावात विजयी उमेदवार आल्यानंतर गावात दगडफेक झाली. यात एक जखमी व अनेक वाहनाचे नुकसान झाले यासंबंधी औराद शहाजानी पोलिस ठाण्यात १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच आरोपीना अटक करण्यात आले आहेत.

आयुब दस्तगीर शेख यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, निलंगा येथून विजयी उमेदवार  गावात आल्यानंतर गावातील आरोपी बस्वराज संगप्पा पाटील व अन्य १२ साथीदारांनी अचानक दगडफेक करुन दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड करून नुकसान केले आहे.यात जखमी मी स्वता जखमी झालो आहे.या दगडफेकीत एक कार, एक जीप, एक बुलेट याचे नुकसान झाले आहे. याविषयी औराद शहाजानी पोलिस ठाण्यात आरोपी बस्वराज संगप्पा पाटील व अन्य बारा साथीदारावर कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ४२७ भादवी १३५ म. पो. कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदर घटना घडल्या नंतर औराद शहाजानी, कासारसिरसी पोलिस पथक गावात पोहोचले. शिवाय उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून शांतता कमिटीची बैठक रात्री उशिरा सुरू घेण्यात आली व गावातील दोन्ही गटाच्या नागरिकांना समजावून सांगून कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.सध्या गावात शांतता आहे परंतु पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

तालुक्यातील ६८ गावच्या ग्रामपंचायत निकालात अनेक गावात धक्कादायक निकाल लागला आणि दिग्गज पुढाऱ्यांना यात पराभव पत्करावा परंतु तांबाळा गावात आपले पॕनल पडल्याचा राग मनात धरून तेथील बारा तेरा लोकांच्या जमावाने विजयी उमेदवारांच्या घरावर व गाड्यावर दगडफेक करून मोठे नुकसान केले आहे.

Share