गली बॉय’मधील रॅपर ‘एमसी तोडफोड’ फेम धर्मेश परमारचे निधन

मुंबई-  झोया अख्तरच्या ‘गली बॉय’ चित्रपटामधील ‘इंडिया ९१’ या गाण्याला आवाज देणारा रॅपर धर्मेश परमार, ज्याला ‘एमसी तोडफोड’ म्हणून ओळखले जाते त्याचे वयाच्या २४ व्या वर्षी निधन झाले आहे. या तरुण गायकाच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. धर्मेश मुंबईस्थित हिप-हॉप सामूहिक स्वदेशी या बॅण्डशी संबंधित होता.

धर्मेशच्या निधानबद्दल गली बॉय चित्रपटाचे अभिनेते रणवीर सिंग आणि सिद्धांत चतुर्वेदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तर या चित्रपटाची दिग्दर्शिका झोया अख्तर यांनी देखील दु:ख व्यक्त केले आहे. स्वदेशी बॅण्डने धर्मेश परमारच्या मृत्यूच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. काही माध्यमांवर सांगितलं जात आहे की धर्मेशचा अपघाती मृत्यू झाला आहे. परंतु अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रणवीर, सिद्धांत, झोया यांच्यासह अनेकांना धर्मेशच्या निधानवर शोक व्यक्त केला आहे.

Share